Category बातम्या

“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आता शासकीय स्तरावर होणार साजरी

आमदार नितेश राणे यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन कणकवली I मयुर ठाकूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा अभिमानास्पद वारसा युती शासनाने पुढे नेला आहे. अशा…

सिंधुदुर्गात पहिला मृतदेह विद्युत दाहिनीवर दहन करण्यात यश !

कणकवली नगरपंचायतीचा उपक्रम ; नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची माहिती कणकवली I मयुर ठाकूर : कोरोना कालावधीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण झाल्याने कणकवली नगरपंचायतीच्या मागणीनुसार तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी नगरपंचायतीला विद्युत शवदाहिनी उपलब्ध करून दिली…

रस्ता कामावरून ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने – सामने !

उपसरपंचाकडून धक्काबुक्की झाल्याची ग्रा. पं. सदस्याची तक्रार मालवण : कुंभारमाठ मधील रस्ता कामावरून शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा लोकप्रतिनिधी आमने सामने आल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे युवा ग्रा. पं. सदस्य राहुल प्रमोद परब यांच्या तक्रारीवरून उपसरपंच…

साताऱ्याच्या पर्यटकांचा किल्ले सिंधुदुर्गवर “धिंगाणा” ; स्थानिक महिलांना जबर मारहाण

स्थानिक संतप्त ; मात्र पर्यटकांच्या माफीनाम्यानंतर प्रकरणावर पडदा पोलीस ठाण्यात राजकीय पदाधिकाऱ्यांची गर्दी ; पदाधिकाऱ्यांकडून संयमाची भूमिका मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या सातारा येथील ४० ते ४४ पर्यटकांच्या ग्रुपने ५ रुपयांच्या छुल्लक करावरून धिंगाणा घातल्याचा संतापजनक प्रकार…

शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड…!

कणकवली I मयुर ठाकूर : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा विद्यार्थी कु. गणेश विनोद दाभोळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तो आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो आता विभागीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे…

… त्यासाठी आमदार वैभव नाईक यांचाच पाठपुरावा !

मालवण : महाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिह्यातील मच्छिमारांना डिझेल परतावा मंजूर झाला. याचे श्रेय कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांचे आहे. नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी डिझेल परतावा संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

परमहंस भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ रोजी.!

कणकवली I मयुर ठाकूर : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा २२ जानेवारी रोजी कणकवली कॉलेज कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले आहे. संस्थानचा प्रवेश अर्ज भरून…

हळवल फाट्यावरील अपघात प्रकरणी महामार्ग ठेकेदार व प्राधिकरणवर गुन्हा दाखल करा !

टोलमुक्त कृती समितीच्या वतीने कणकवली पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर कणकवली I मयुर ठाकूर : हळवल फाटा येथे झालेल्या आरामबसच्या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात आणखी काही प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात व यापूर्वी याठिकाणी घडलेल्या अपघातास…

वायरी भुतनाथ गावातील रिक्त पोलीस पाटील पद भरा…

सरपंच भगवान लुडबे यांच्यासह ग्रामस्थांची मालवण महसूल प्रशासनाकडे मागणी मालवण : सुमारे २,८९२ लोकवस्ती असलेल्या वायरी भुतनाथ गावात गेली २० वर्षे पोलीस पाटील पद रिक्त आहे. दाखले व अन्य कामांबाबत ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तरी गावातील पोलीस पाटील पद भरण्यात…

युती शासनाचा दिलासा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मत्स्य सोसायट्यांना डिझेल परतावा ; अन्य प्रश्नही मार्गी

मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह ना. रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणे यांचे मच्छीमारांनी मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्यविकास सोसायट्यांना भाजपा – शिंदे सरकारने दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सोसायट्यांना यापूर्वी हक्काच्या डिझेल परताव्यासाठी शासनाकडे हाजी हाजी करावे…

error: Content is protected !!