Category News

धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा

हेरिटेज टुरिझमसाठी नवे दालन खुले होणार मालवण (कुणाल मांजरेकर) मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. मालवण…

महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच सेवा द्या

गौरव सोहळा व महसूल दिन सप्ताह शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : शासन अनेक कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असते. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यामध्ये महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. या अनुषंगाने 1 ते…

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरील विमानसेवा सुरळीत करणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या…

भाजपा नेते निलेश राणेंनी मंत्रालयात घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

कुडाळ आणि मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा मालवण : भाजपा नेते निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची मुंबई मंत्रालय येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कुडाळ, मालवण तालुक्यातील विविध विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती…

मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर !

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारावर निशाणा शहरात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिम राबविणेबाबत मुख्याधिकारी सुशेगात असल्याचा आरोप मालवण : मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या वरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांवर टिकास्त्र सोडलं आहे. शहरात…

दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कटीबद्ध

ओरोस येथील चर्चासत्रात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ गोकुळ व भगीरथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेती या…

दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने मालवणात नाना शंकरशेठ यांची पुण्यतिथी साजरी…

नानांच्या प्रलंबित मागण्या केंद्र, राज्य शासनाने पूर्ण कराव्यात : अनिल मालवणकर यांची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर येथील दैवज्ञ हितवर्धक समाजाच्या वतीने नामदार नाना शंकरशेठ यांची १५८ वी पुण्यतिथी सोमवारी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने दैवज्ञ भवनच्या प्रांगणातील नामदार नाना शंकरशेठ…

रेवतळे येथे उद्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आणि भाजपा युवा मोर्चा मालवणच्या वतीने आयोजन मालवण : भाजपचे माजी नगरसेवक दिपक पाटकर आणि युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून तसेच सौरभ ताम्हणकर व भाजपा युवा मोर्चा मालवण यांच्या वतीने शहरातील…

सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार

मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथे किनारपट्टीवर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून धूप प्रतिबंधक बंधाराकम रस्त्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून हे काम करण्याचे वचन आ. वैभव नाईक यांनी दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत वचनपूर्ती केली त्याबद्दल सर्जेकोट…

महेश कांदळगावकर, यतीन खोत यांची तत्परता ; “तो” धोकादायक खड्डा स्वखर्चाने बुजवला

मालवण : शहरातील माघी गणेश चौकात भुयारी गटार योजनेच्या चेंबरच्या ठिकाणी पडलेला भलामोठा खड्डा वाहन चालकांना धोकादायक बनला होता. याबाबत स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सोमवारी स्वखर्चाने हा खड्डा बुजवला आहे.…

error: Content is protected !!