महेश कांदळगावकर, यतीन खोत यांची तत्परता ; “तो” धोकादायक खड्डा स्वखर्चाने बुजवला

मालवण : शहरातील माघी गणेश चौकात भुयारी गटार योजनेच्या चेंबरच्या ठिकाणी पडलेला भलामोठा खड्डा वाहन चालकांना धोकादायक बनला होता. याबाबत स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेऊन माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सोमवारी स्वखर्चाने हा खड्डा बुजवला आहे.

या परिसरात टोपीवाला हायस्कुल, रोझरी इंग्लिश स्कुल या दोन मोठ्या प्रशाला आहेत. ह्या खड्ड्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालक तसेच शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागत होता. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली होती. त्यामुळे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी नगरसेवक यतीन खोत यांनी सोमवारी स्वखर्चाने हा खड्डा बुजवला आहे. याबाबत स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शाखाप्रमुख मनोज शिरोडकर, निलेश पेडणेकर, शुभम माने, श्री. सारंग, विल्सन आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!