सर्जेकोट मिर्याबांदा ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार
मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथे किनारपट्टीवर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून धूप प्रतिबंधक बंधाराकम रस्त्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून हे काम करण्याचे वचन आ. वैभव नाईक यांनी दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत वचनपूर्ती केली त्याबद्दल सर्जेकोट मिर्याबांदा येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.:
आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना आमदार वैभव नाईक यांनी सर्जेकोट पिरावाडी येथे धूप बंधाऱ्याच्या झालेल्या कामाची पाहणी केली. याठिकाणी स्लोपींगचे काम सुरु असून स्लोपींगची लांबी ८ ते १० मीटरने वाढवून मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, सर्जेकोट ग्रा. प. सदस्या भारती आडकर, रघुनंदन(मामा) खडपकर, शाखा प्रमुख विनायक कोळंबकर, केशव सावजी, संजय जामसंडेकर, नरेंद्र जामसंडेकर, हरी खवणेकर, चेतन खडपकर,प्रशांत जामसंडेकर, दीपक जामसंडेकर, योगेश कांदळगावकर, अक्षय जामसंडेकर, नाना आडकर, धनंजय जामसंडेकर, संतोष जामसंडेकर, विनायक आरोलकर, गुरुनाथ खवणेकर, वैभव कांदळगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.