Kunal Manjrekar

Kunal Manjrekar

मालवणात मनसेतर्फे रंगपंचमी निमित्त पर्यावरण पूरक रंगाचे वाटप 

मालवण : रंगपंचमी म्हणजे रंगांचा दिवस. या दिवशी निरनिराळ्या रंगांची उधळण करून आनंद साजरा केला जातो. या आनंदात जास्तीत जास्त नागरिक सहभागी होऊन त्यांनी या आनंदाच्या उत्सवात सहभाग घ्यावा, या हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मालवण शहराच्या वतीने पर्यावरण पूरक रंगांचे…

चेन्नई ते मुंबई सायकल प्रवासावर निघालेले रोटरी सदस्य मालवणात

रोटरी क्लब मालवणसह रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० यांनी केले स्वागत मालवण : चेन्नई ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हा सुमारे २ हजार किलोमीटरचा टप्पा सायक्लोथॉन या उपक्रमाद्वारे म्हणजेच सायकल वरून प्रवास करून मानसिक आरोग्य जनजागृती आणि पोलिओ निर्मूलन संदेश देण्यासाठी…

रस्त्यावर आडव्या आलेल्या गाईला धडकून मोटरसायकलस्वार गंभीर

मालवण कुंभारमाठ येथील दुर्घटना ; अधिक उपचारासाठी बांबुळीला हलवले मालवण : दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने तिला धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०, रा. आनंदव्हाळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात…

मालवणात धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण ; आडारी नदीत युवक बुडाला

मालवण : धुलीवंदनाचा उत्सव आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना मालवणमध्ये धुलीवंदनाच्या उत्साहावर विरजण पडले आहे. रंगपंचमी करून आंघोळीसाठी आडारी नदीपात्रात उतरलेला देवेंद्र उर्फ दीपक जयराज वेंगुर्लेकर (वय २५) हा युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र…

ऑनलाईन फसवणुकीच्या जिल्ह्यात १ हजार ६०९ तक्रारी प्राप्त ; ७२ लाख रुपये संबंधित बँक खात्यात गोठविले

फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि २३ (जिमाका) ऑनलाइन फसवणूक, हॅकिंग, सोशल मीडिया फ्रॉड अशा वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता गृह मंत्रालयाने हे ऑनलाईन तक्रार पोर्टल तसेच १९३० हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केलेला…

थकबाकी वसुलीसाठी मालवणात नगरपालिका प्रशासन आक्रमक ; दोन थकीत नळजोडण्या तोडल्या

मालवण : मालवण नगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज धडक पाणीपट्टी वसुली मोहीम राबवित दोन थकीत नळजोडणी तोडण्याची कारवाई करण्यात आली.  यात शहरातील तसेच कुंभारमाठ ग्रामपंचायत हद्दीतील २ थकीत नळजोडणी धारकांना पाणीपट्टी वसुली पथक सोनाली हळदणकर,…

माडावरून खाली पडल्याने मालवणात युवक गंभीर 

मालवण : मालवण वायरी मोरेश्वरवाडी येथील हार्दिक अंकुश ढोके (वय २५) हा तरुण माडावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. हार्दिक याला तातडीने मालवण शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा…

सीईओंचा अन्यायकारक फतवा ; जलजीवनचे ठेकेदार आक्रमक ; ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयासमोर आंदोलन

कामे बंद करण्याचा दिला इशारा ; शुक्रवारी सीईओंची भेट घेऊन व्यथा मांडणार मालवण ( कुणाल मांजरेकर) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जलजीवनच्या ठेकेदारांची कोणतीही चुक नसताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. सदोष निविदा प्रक्रिया, चुकीची अंदाजपत्रके, मुदतवाढ यासह अन्य…

महेश कांदळगावकर यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट ; शहरातील विविध समस्यांबाबत चर्चा

मालवण : मालवण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नुकतीच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कुडाळ येथे भेट घेतली. यावेळी मालवण शहर विकासाबाबतचे प्रश्न मांडताना या समस्या सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्रामुख्याने शहरात पालिका प्रशासनाचे स्वच्छतेबाबत नियोजन नाही, बायो…

मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तपदी सागर कुवेस्कर यांची नियुक्ती ; पारंपरिक मच्छिमारांनी केले स्वागत

मालवण : येथील मत्स्यव्यवसाय विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून सागर कुवेस्कर यांची नियुक्ती झाली आहे. याबद्दल पारंपरिक मच्छीमार नेते बाबी जोगी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजू परब, अक्षय रेवडकर, हेमंत मोडकर, गणपत आडीवरेकर आदी उपस्थित होते.…

error: Content is protected !!