युती सरकारने करून दाखवलं ; तोंडवळी- तळाशीलच्या सागरी अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार !
तोंडवळी तळाशीलसह सर्जेकोट येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी १० कोटींचा निधी
सर्जेकोट
युवामोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगांवकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. निलेश राणेंचे मानले आभार
मालवण : राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने सादर केलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मालवण तालुक्यात किनारपट्टी भागात धुपप्रतिबंधक बंधारे, संरक्षक भिंत यासाठी ४२ कोटी निधी मंजूर केला. त्यापैकी तळाशील तोंडवळी येथे विलास झाड घर ते गोविंद पेडणेकर घर पर्यत धुपप्रतिबंधक बंधारा ५ कोटी निधी तसेच सर्जेकोट सुवर्णकडा येथे समुद्रकिनारी धुपप्रतिबंधक बंधारा बांधणे भाग २ यासाठी ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत सुनील घाडीगांवकर यांनी आभार मानले आहेत.