शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल !
आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख : सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांच्यावर जबाबदारी
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले आहेत. आता प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार कणकवली विधानसभा मतदार संघात सतीश सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात संदेश पारकर तर कुडाळ विधानसभा मतदार संघात संजय पडते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदी अतुल रावराणे तर जिल्हा समन्व्यक पदी बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव खा. विनायक राऊत यांनी ही नावे जाहीर केली आहेत. यात कुडाळ विधानसभा संघटक पदी श्रीम. श्रेया परब आणि वैभववाडी तालुका संघटक पदी लक्ष्मण रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.