रिक्षा व्यावसायिकांचं “स्वामी प्रेम” ; तब्बल ४५० कि. मी. चा प्रवास करत अक्कलकोटचा प्रवास

११ रिक्षांसह ३३ रिक्षा व्यवसायिकांचा सहभाग ; उद्या घेणार स्वामींचं दर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील रिक्षा चालकांचं अनोखं स्वामी प्रेम पाहायला मिळालं आहे. शहरातील तब्बल ३३ रिक्षा चालकांनी ११ रिक्षा घेऊन बुधवारी अक्कलकोटच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. साडेचारशे किलोमीटर अंतर रिक्षाने गाठून हे रिक्षाचालक उद्या ( गुरुवारी) स्वामींचं दर्शन घेणार आहेत.

मालवण शहरातील विविध स्थानकांवर सेवा देणाऱ्या या रिक्षा चालकांनी स्वखर्चाने रिक्षा घेऊन सुमारे साडेचारशे किमीचा हा प्रवास सुरु केला आहे. मध्यरात्री उशिरा ते अक्कलकोटला दाखल होणार असून उद्या सकाळी स्वामींचे दर्शन घेणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!