भाजयुमोचा मालवण मधील युवक संवाद मेळावा पुढे ढकलला ; आता ३ मार्चला आयोजन

माजी खा. निलेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती : ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मालवण येथील दैवज्ञ भवनच्या सभागृहात मंगळवारी २८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला युवक संवाद मेळावा पुढे ढकलला आहे. आता ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवनच्या सभागृहात हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजयुमोचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.

यावेळी भाजयुमो सरचिटणीस निशय पालेकर, राकेश सावंत, निकित वराडकर, चंद्रकांत मयेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, नारायण लुडबे आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजयुमो जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, भाजपा नेते दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, विक्रांत नाईक आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात रोजगार, स्वयंरोजगार आणि संघटन वाढीच्या दृष्टीने मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहेत. तरी या मेळाव्यास युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण शहर भाजयुमोच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!