हिंदळेचे अजित दळवी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

मसुरे (प्रतिनिधी) नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था (नेफडो) पालघर जिल्हा व कोकणी मालवणी सामाजिक संस्था,विरार यांच्या वतीने देवगड तालुक्यातील हिंदळे गावचे सुपुत्र अजित दळवी याना आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा वेवूर – पालघर येथे विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य नै.पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कोकण विभाग उपाध्यक्ष श्री. प्रकाश कदम, नै प.सं. व मानवता वि. संस्थेचे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री बापू परब, पालघर जिल्हा व उपाध्यक्ष श्री सुभाष जाधव,पालघर जिल्हा सचिव श्री प्रकाश घाडीगावकर उपस्थित होते.

कोरोना काळात अविरत ऑनलाइन शिक्षण व्दारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक देणे तसेच सर फौंडेशन महाराष्ट्र अजीवन सदस्य असून ते शैक्षणिक स्पर्धा घेतात. पालघर जिल्हा समन्वयक असून विविध स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना संधी निर्माण करतात.पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीत प्रशिक्षण विभाग, कोकणकला व शिक्षण विकास संस्थचे पालघर विभागीय अध्यक्ष असून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत.
विद्यार्थ्यांना सतत विज्ञान प्रदर्शन व विज्ञान विषयक स्पर्धेत सतत सहभाग देण्याचे काम ते करतात.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत राज्यात पाचवा क्रमांक त्यांनी २०२०-२१ मध्ये प्राप्त केला आहे. अजित दळवी याना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!