सरसंघचालक मोहन भागवत १ व २ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात !
किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्गच्या प्रतिकृतींचे होणार लोकार्पण
सुरक्षा यंत्रणेकडून जय्यत तयारी ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा
मालवण | कुणाल मांजरेकर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत १ आणि २ फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. हा त्यांचा प्रवास संघटनात्मक कामासंदर्भात असून १ फेब्रुवारीला ते सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत. मोहन भागवत याना झेड प्लस सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या मालवण दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेऊन आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनाअंतर्गत कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे येत आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघ स्वयंसेवकांची बैठक संपन्न होणार आहे. या प्रवासात सिंधुदुर्ग किल्यालाही ते भेट देणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने तयार केलेल्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ला प्रतिकृतींचे लोकार्पण केले जाणार आहे.