महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती वारसा मंडळाच्या वतीने २८ रोजी हळदीकुंकू समारंभ

मालवण : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या समन्वयातून आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्षादभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रथसप्तमी निमित्ताने मालवण तालुका महिला काँग्रेस आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण. यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ नजिकच्या निवासस्थानी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास सर्व महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला काँग्रेस कमिटी सदस्य पल्लवी तारी – खानोलकर, मालवण तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष ममता रुपेश तळगावकर, वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची पराग माणगांवकर, तालुका उपाध्यक्ष शोभना सूर्यकांत चिंदरकर, रुपाली जेम्स फर्नांडिस, शुभदा गणेश पाडगावकर, सारिका हेमंत तळवडेकर आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!