भास्कर जाधव… लायकीत रहा नाहीतर गुहागरमध्ये येऊन तुझी लायकी काढणार !
केंद्रीय मंत्री नारायण राणेंवरील टीकेनंतर भाजपा नेते निलेश राणे यांचं आ. जाधवांना जोरदार प्रत्युत्तर ; भास्कर जाधवची अवस्था म्हणजे “अंधो में एक काणा”
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेचा राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राणेसाहेब भास्कर जाधव बाबत बोलत पण नाहीत. पण हिंदीत एक म्हण आहे, “”अंधो में एक काणा होता है”. तसा उद्धव ठाकरे यांचा तू “काण्या”. त्यांच्याकडे दुसरं कोण नाही, म्हणून तू ओकतोस. यापुढे शिस्तीत रहा, नाहीतर गुहागर मध्ये येऊन तुझी लायकी काढणार, असा सज्जड इशारा देतानाच हा निलेश राणेच एक दिवस तुला घरी पाठवणार आणि तुझं राजकारण संपवणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राणेनी टीका केल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणेंवर टीका केली होती. “नारायण राणे हा शक्तीपात झालेला नेता आहे. स्वत: नारायणराव राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं सिताफळ, अशी अवस्था आहे. त्यांना स्वत:ला निवडून येणं अवघड आहे. स्वत:च्या मुलाला निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याची शक्ती राहिली की नाही राहिली, याचं मूल्यमापन करावं” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. याचा निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
भास्कर जाधवला राणेसाहेब कधी कळणार नाही, त्याचं कोणाशीही पटत नाही. त्याची रोजच किटकिट असते. रमेश कदम, उदय सामंत, रामदास कदम, शेखर निकम, सुनील तटकरे यांच्याशी देखील त्याचं पटत नाही. राणेसाहेब तुझ्याबद्दल बोलत पण नाहीत. तुझी दखल सुद्धा घेत नाहीत. तु कितीही भुंकला तरी तुझ्याकडे बघत देखील नाहीत. त्यामुळे तु स्वतःच्या लायकीत रहा.
मुलाला दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून उभं करायची हिंमत नाही
राणेसाहेब स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली होती. त्याचा समाचार घेताना “अरे बाबा राणेसाहेबांचा मुलगा निवडणुकीला उभा तरी राहतो. तु तुझ्या मुलाला दुसऱ्यांदा उभा का नाही केलास ? फाटली ना तुझी ?
एका शहराचा नगरसेवक म्हणून तु त्याला उभा करू नाही शकलास. एका वॉर्ड पुरता… आणि म्हणे मी शेठ” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता केवळ पाच माणसे शिल्लक राहिली आहेत. एक म्हण आहे ना … अंधो मे काना शाणा होता है… तु उद्धव ठाकरेंचा काण्या… त्यांच्याकडे दुसरं कोण नाही, म्हणून तु ओकतोस. म्हणून मीडिया वाले तुझ्याकडे येतात. शिस्तीत राहा. तुझ्याकडे पाच कार्यकर्ते नाहीत. मागे तुझ्या घरावर काय झालं तेव्हा एक महिना घराच्या बाहेर निघाला नाहीस. निलेश राणेने तुला एकदा नाही दोनदा नाही, तीन ते चार वेळा तुझी औकात दाखवली. राणे साहेबांबर बोलशील तर अजूनही भाषा खाली जाऊ शकते. राणे साहेब आपल्या लेव्हलच काम करतील. तू तुझ्या लेव्हल मध्ये राहायचं. नाहीतर गुहागर मध्ये येऊन तुझी लायकी काढणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.