सुकळवाड ग्रा. पं. मध्ये ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका !

सरपंच युवराज गरुड यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडेंचा केला पराभव ; सात सदस्यही विजयी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील सुकळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ब्राम्हणदेव ग्रामविकास पॅनलचा डंका पाहायला मिळाला. सरपंच पदाच्या निवडणुकीत युवराज गरुड विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या सरिता पाताडे यांचा सुमारे दीडशे मतांनी पराभव केला.

या ग्रा. पं. मध्ये श्री ब्राह्मण देव ग्रामविकास पॅनलचे सात तर शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून आले. श्री ब्राह्मणदेव ग्रामविकास पॅनलचे सदस्य म्हणून जानवी पालकर, नरेंद्र पाताडे, अविनाश गरुड, किशोर पेडणेकर, वैदेही मोरजकर, जानकी पावसकर व विशाल वाळके यांचा विजय झाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!