राजापूर हातिवले येथील टोलनाका कार्यान्वित ; निलेश राणे आक्रमक
उद्या सकाळी टोलनाक्यावर जाऊन टोल वसुली बंद पाडणार ; राणेंचा इशारा
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप सुरु असताना प्रशासनाला टोल वसुलीची घाई असल्याचे चित्र राजापूर मध्ये दिसून आले आहे. राजापूर हातीवले येथील टोल नाका आजपासून सुरु करण्यात आला असून याविरोधात भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे आक्रमक झाले आहेत. उद्या सकाळी १० वाजता मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांसोबत येथे जाऊन टोल वसुली बंद पाडणार असल्याचा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
राजापूर तालुक्यात महामार्गाचे काम अपूर्ण असून सुद्धा अनधिकृत पणे हातिवले गावात टोल वसुली आज सुरू केली. उद्या मी माझ्या सहकाऱ्यांसोबत १० वाजता स्वतः टोल वर जाणार आणि टोल बंद पाडणार, टोलला विरोध नाही पण काम पूर्ण होईपर्यंत आणि इतर विषय सुटल्याशिवाय टोल सुरू करायला देणार नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.