प्रतिष्ठेच्या लढतीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ ; मालवण खरेदी विक्री संघात भाजपाचा मोठा विजय

खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ ही जागांवर भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय

भाजपा कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष ; माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती

माजी खा. निलेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची निवडणूक रणनीती यशस्वी

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी मधील प्रतिष्ठेच्या लढतीमुळे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत खरेदी विक्री संघाच्या १५ पैकी १५ ही जागांवर भाजपने एकतर्फी विजय मिळवत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला भुईसपाट केले आहे. या निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी माजी खा. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. माजी खा. राणे यांनी स्वतः मालवणात येऊन विजयी उमेदवारांचे कौतुक करताना धोंडू चिंदरकर यांच्या प्रचार नियोजनाचे विशेष कौतुक केले.

मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीत समोरासमोर लढत झाली. सहकाराचा अभ्यास असलेले मातब्बर नेते महाविकास आघाडीकडे होते. तर भाजपने कार्यकर्त्यांच्या बळावर प्रचार यंत्रणा राबवली. कै. सुनील मलये यांना मानणाऱ्या कामगारांच्या पॅनल ने भाजपला पाठींबा दिला होता. या पॅनलचे तीन उमेदवार भाजपाकडून निवडणूक रिंगणात होते. टोपीवाला हायस्कुलमध्ये मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी 3072 पैकी 1256 जणांनी मतदान केले. त्याची मतमोजणी सायंकाळी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. सर्व १५ ही जागांवर भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

पत्रकार कृष्णा ढोलम सर्वाधिक मतांनी विजयी

कै. सुनील मलये यांच्या पॅनल मधील पत्रकार कृष्णा ढोलम भाजपाच्या वतीने निवडणूक रिंगणात उभे होते. त्यांनी या निवडणुकीत सर्वाधिक 787 मते मिळवली. या निवडणुकी मधील भाजपा पुरस्कृत पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – संस्था मतदार संघ : महेश बाळकृष्ण मांजरेकर (20 मते), कृष्णा पांडुरंग चव्हाण (20 मते), प्रफुल्ल वासुदेव प्रभू (19 मते), राजेश नारायण प्रभूदेसाई (19 मते), अभय प्रभुदेसाई – (19 मते), राजन जगन्नाथ गावकर (18 मते) व्यक्ती मतदार संघ – रमेश उर्फ आबा हडकर (583 मते), गोविंद बाळकृष्ण गावडे (615 मते), विजय वसंत ढोलम (672 मते), महेश लक्ष्मण गावकर (622 मते),इतर मागास वर्ग – कृष्णा हरिश्चंद्र ढोलम (787 मते), महिला प्रतिनिधी- सरोज शिवाजी परब (675), अमृता अशोक सावंत (633), अनुसूचित जाती जमाती- सुरेश ज्ञानदेव भटक्या (715), भटक्या विमुक्त जाती जमाती – अशोक लाडोबा तोडणकर ( 725 मते)

एकूण उमेदवार आणि मिळालेली मते

भाजपचा जल्लोष

मागील काही निवडणुकांमध्ये निर्विवाद यशापासून वंचित असलेल्या भाजपने खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार कमबॅक केले आहे. आगामी काळातील ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विजय भाजपसाठी महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे ह्या विजयानंतर भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यामध्ये जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, विजय केनवडेकर, बाळू कुबल, राजू परुळेकर, राजू बिडये, महेश सारंग, सौरभ ताम्हणकर, मोहन वराडकर, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, महेंद्र चव्हाण, गणेश कुशे, बबलू राऊत, विकी तोरसकर, दिलीप बिरमोळे, संतोष गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, चारुशीला आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

निलेश राणेंकडून विजयी उमेदवारांचा सत्कार

भाजपच्या या मोठ्या विजयानंतर भाजपचे नेते निलेश राणे मालवणमध्ये उपस्थित राहिले. त्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. यानंतर भाजपच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांच्या या विजयाचे कौतुक केले. विशेष करून भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवली. त्याचे कौतुक करताना यापुढील प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हाच उत्साह कायम ठेवण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले. यावेळी धोंडू चिंदरकर यांनी या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने गटतट बाजूला ठेऊन एक विचाराने सांघिक काम केल्याचे सांगून निलेश राणे यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.

भाजपा तालुकाध्यक्षांचे प्रभावी नियोजन

या निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचे प्रभावी निवडणूक नियोजन पाहायला मिळाले. उमेदवार निवडी पासून प्रचाराची पूर्ण जबाबदारी निलेश राणे यांनी त्यांच्यावर सोपवली होती. या निवडणुकीत भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी असताना त्यांची समजूत काढून चिंदरकर यांनी योग्य उमेदवार रिंगणात उतरवले. तसेच कै. सुनील मलये पॅनल ला आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश मिळाले. त्यामुळेच खरेदी विक्री संघात भाजपला मोठा विजय मिळाला. यापूर्वी मालवण तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत देखील धोंडू चिंदरकर यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!