किनारा स्वच्छता अभियानच्या तारखेत बदल ; आता २० नोव्हेंबरला आयोजन
सौरभ ताम्हणकर यांची माहिती ; खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमुळे निर्णय
मालवण | कुणाल मांजरेकर
येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने उद्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर किनारा स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. मात्र उद्या होणाऱ्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकी मुळे या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. आता पुढील रविवारी २० नोव्हेंबर रोजी हे स्वच्छता अभियान होणार असल्याची माहिती सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.
मालवणचा पर्यटन हंगाम आता सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर किनाऱ्यांची अस्वच्छता पर्यटन वाढीसाठी चिंतेचा विषय असून या पार्श्वभूमीवर सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने किनारा स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. उद्याच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणूकी मुळे १३ ऐवजी पुढील रविवारी २० नोव्हेंबर रोजी दांडी ते बंदर जेटी किनाऱ्यावर हे अभियान राबवले जाणार आहे.