सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने फोंडबा कुटुंबियांना २ लाखांच्या मदतीचा धनादेश

मालवण : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँके च्यावतीने सर्जेकोट येथील फोंडबा कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शंकर सखाराम फोंडबा यांचे १२ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मालवण शहर शाखेकडून फोंडबा यांचा विम्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो मंजूर होऊन २ लाख रक्कमेचा धनादेश मालवण शहर शाखेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा बँक संचालक व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, तालूका विकास अधिकारी पूर्णानंद सरमळकर, सुरज गवंडी, श्री. केळूसकर, शाखाव्यवस्थापक श्री. गोसावी, श्री. साळसकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!