उद्धव ठाकरे, या जन्मातील पापं याचं जन्मात फेडावी लागणार, ही तर सुरुवात !

निलेश राणेंची टीका ; आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींशी बरोबरी न करण्याचा सल्ला

सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यास मनाई केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भाजपा आणि शिंदे गटावर आरोप केले जात आहेत. त्यावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

नियतीनेच उद्धव ठाकरेंचे बारा वाजवले आहेत. फुकट मिळालेल्या गोष्टींवर किती उडायचं याला मर्यादा आहेत. उद्धव ठाकरेने आयुष्यभर फुकट बसून खाल्लं, त्याला वाटलं सगळं असंच राहणार पण हे कर्म आहेत उद्धव ठाकरे तुला याच जन्मात फेडावे लागणार आणि ही सुरुवात आहे अजून भरपूर तुला भोगावे लागणार, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का दिल्यानंतर शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांची तुलना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी केली जात आहे. याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी उद्धव ठाकरेनी बरोबरी करू नये. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते तिथून ते वेगळे झाले आणि स्वतःचा पक्ष उभा करून ते मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेला बापाचा पक्ष आयता मिळाला आणि तोच पक्ष संपवणारा उद्धव ठाकरे एकच, असे राणे यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांनी स्वर्गातून शब्द पूर्ण केला

बाळासाहेबांनी स्वर्गातून देखील आपला शब्द पूर्ण केला, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होत त्या, त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन आणि आज शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली पाहून बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्षाचं अधिकृत चिन्ह गेलं. उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!