…अन्यथा मालवण मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार ; निलेश राणेंचा इशारा

मालवण : मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मात्र ते मालवण मुख्यालयी न राहता ओरोस येथे राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी सध्याचा आपत्ती काळ व एकूणच त्यांच्यावर असलेली जबाबदारी लक्षात घेता त्यांनी मालवण मुख्यालय या ठिकाणीच रहावे, अन्यथा याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच नगरविकास विभाग यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली जाणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

मालवण नगरपरिषदेवर सध्यस्थितीत प्रशासकीय राजवट आहे. सोबतच पावसाळी व आपत्ती काळ सुरु आहे. तसेच मालवण शहर हे प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीवर वसलेले असल्याने आपत्तीच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असते. या सर्व पार्श्वभूमीवर मालवण शहराचे प्रमुख या नात्याने मुख्याधिकारी यांनी मुख्यालय याच ठिकाणी राहणे नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, मुख्याधिकारी मुख्यालय ठिकाणी राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी विचारात घेता मुख्याधिकारी जर मुख्यालय ठीकाणी राहत नसतील तर त्यांच्यावर योग्यती कारवाई व्हावी यबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी अशी भूमिका निलेश राणे यांनी स्पष्ट केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!