शिवसेनेच्या वतीने मालवणात उद्यापासून दोन दिवस विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती

मालवण : मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने १६ आणि १७ जुलै रोजी विभाग स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महीला जिल्हा आघाडी प्रमूख जान्हवी सावंत, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या बैठकीस उपतालुकाप्रमूख, विभागप्रमुख उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, महीलाआघाडीच्या सर्व पदाधिकारी, युवासेना सर्व पदाधिकारी शिवसैनिक, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

तालुका शिवसेनेचा नियोजित दौरा

शनिवार १६ जुलै – सकाळी ११ वाजता पोईप विभागाची बैठक, दुपारी ३ वाजता पेंडुर विभागाची बैठक, सायंकाळी ५ वाजता देवबाग विभागाची बैठक. रविवार १७ जुलै – सकाळी ११ वाजता गोळवण विभागाची बैठक, दुपारी ३ वाजता मसुरे विभागाची बैठक, सायंकाळी ४.३० वाजता आचरा विभागाची बैठक, सायंकाळी ६ वाजता आडवली – मालडी विभागाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!