असरोंडी विद्यामंदिरला एसएससी २०१०-११ च्या बॅचकडून अनोखी गुरुवंदना

प्रशालेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा केली उपलब्ध ; संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी मानले आभार

कुणाल मांजरेकर

मालवण : असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीच्या दहावी २०१०-११ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्त केलेल्या शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत प्रशालेला सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची यंत्रणा बसवून दिली आहे.

ही यंत्रणा शाळेच्या सुरक्षेसाठी उपयुक्त आहे. या यंत्रणेसाठी निधी जमा करुन शाळेला गुरुदक्षिणा दिल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष विजय सावंत, सचिव प्रकाश सावंत, सर्व संचालक मंडळ सदस्य, मुख्याध्यापक सुशांत पाटील, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!