मालवण पं. स. च्या गटविकास अधिकारीपदी आप्पासाहेब गुजर

माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी केले स्वागत

मालवण : मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी आप्पासाहेब रामचंद्र गुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगांवकर, श्रावण सरपंच प्रशांत परब व पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

सोलापूर अकलूज हे मूळ गाव असलेले आप्पासाहेब गुजर यांनी कृषी अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती दौंड येथे १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून मावळ, मुळशी, हवेली या पंचायत समिती ठिकाणी त्यांनी नऊ वर्षे कार्यभार पाहिला. त्यांची पदोन्नतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बढतीने नियुक्ती देण्यात आली आहे. मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांची रत्नागिरी येथे पदोन्नती झाल्याने आप्पासाहेब गुजर यांची गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!