दीपक पाटकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

मालवण : भाजपचे कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर गुरुवारी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भाजपसह विविध राजकिय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

येथील भाजपा कार्यालयात भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, शहर मंडल प्रभारी अध्यक्ष विजय केनवडेकर, महेश सारंग, पंकज पेडणेकर, प्रमोद करलकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, अभय कदम, विक्रांत नाईक, आबा हडकर, मोहन वराडकर, ललित चव्हाण, दादा वाघ, विलास मुणगेकर, दिलीप बिरमोळे, बाळू मालवणकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर नगरपालिका कार्यालयात माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर, सन्मेश परब यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!