संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं : “हा” फोटो केला ट्विट !

कुणाल मांजरेकर 

नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद क्षमण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. मंगळवारचा संपूर्ण दिवस राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील नाट्यमय घडामोडीने गाजल्यानंतर बुधवारी शिवसेनेचे प्रवक्ते तथा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सामनामधील अग्रलेखातून राणेंवर टीका केली होती. आता ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करत नाव न घेता राणेंना डिवचलं आहे.


नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद मागील पंधरा वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर हा वाद टोकाला पोहोचला असून त्याचीच परिणीती म्हणून नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या एका वक्तव्यावरून ठाकरे सरकारने मंगळवारी दुपारी राणेंना अटक केली. रात्री उशिरा महाड न्यायालयातून राणेंची सशर्त जामिनावर मुक्तता करण्यात आली. यानंतर बुधवारी सकाळी सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेने राणेंवर जहरी टीका केली आहे.
हे कमी की काय म्हणून सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करून पुन्हा एकदा राणेंना डिवचले आहे.

कोंबडीची शिकार करणाऱ्या वाघाचा फोटो संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अधिक भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!