उद्धव ठाकरे हाय हाय … मालवणात भाजपकडून ‘सामना’ ची होळी !
कुणाल मांजरेकर
मालवण : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह अग्रलेख छापण्यात आल्याने मालवण मध्ये भाजपचे कार्यकर्ते बुधवारी आक्रमक झाले आहेत. येथील भाजपच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांनी सामनाची होळी केली. यावेळी राणेसाहेब अंगार है… बाकी सब भंगार है, उद्धव ठाकरे हाय हाय , अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा परिषदेचे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, शहर मंडळ तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, पूजा करलकर, ममता वराडकर, राजन माणगावकर, आतिक शेख, विजय निकम, संतोष कोदे, संतोष गावकर, प्रमोद घाडी, प्रशांत परब, रामचंद्र चोपडेकर, बाबू कासवकार, जॅक्सन लुद्रिक, डॉ. राऊळ, यासिन सय्यद, सुनील घाडीगावकर, प्रमोद घाडी, बबलू राऊत, अविनाश राऊत, सुशांत घाडीगावकर, राजेश तांबे, प्रकाश कासले, तुषार हाटले, आबा पोखरणकर, संदीप भोजने, प्रियाल लोके, आबा हडकर, राजू आंबेरकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.