भाजपच्या वतीने किल्ले सिंधुदुर्गवर ढोलताशांच्या गजरात रंगणार शिवजयंती उत्सव !

प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंची संकल्पना

मालवण : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्सव साजरा करतात येणार आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या संकल्पनेतून किल्ले सिंधुदुर्गवर अलीकडे सातत्याने शिवजयंती उत्सव सोहळा दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदाही हा सोहळा त्याच भव्यतेने साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता बंदर जेटीवरून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार असून १० वाजता शिवराजेश्वर मंदिरात पूजा अर्चा करून महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी मोठया संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!