दांडी येथील आधार लिंक शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचा उपक्रम

मालवण : शिवसेनेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर, सेजल परब आणि पंकज सादये यांच्या पुढाकारातून दांडी झालझुलवाडी येथील जयसिंग पराडकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल आधारकार्ड ला लिंक करण्याच्या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ६० ते ६५ नागरिकांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घेतला. त्याचप्रमाणे काहींना आपला जुना मोबाईल नंबर बदलून नवीन नंबर अपडेट करून घेतला. ज्या नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही, अशा नागरिकांना घरी जाऊन त्याचा मोबाईल नंबर लिंक करून देण्यात आला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोस्ट कर्मचारी अमोल माळकर (बागायत पोस्ट), प्राची पाटकर (देवबाग पोस्ट) आणि विजय तारी (वायरी पोस्ट ) यांनी सहकार्य केले. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!