“वायरीच्या राजा” चे भाजप नेते, माजी खा. निलेश राणेंनी घेतले दर्शन

कै. सुधीर कलिंगण यांना वाहिली श्रद्धांजली

कुणाल मांजरेकर

मालवण : सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या माघी गणेश जयंती उत्सवाला भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री भेट देऊन वायरीच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी नुकतेच निधन झालेले प्रख्यात दशावतारी कलाकार कै. सुधीर कलिंगण यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री माघी गणेश उत्सवाला भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक आप्पा लुडबे, दशावतारी कलाकार नितीन आसयेकर, संजय लुडबे, मंदार लुडबे, शैलेश लुडबे, भाई मांजरेकर आणि जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोसचे कलाकार उपस्थित होते.

यावेळी कै. सुधीर कलींगण याना श्रध्दांजली अर्पण करताना माजी खा. निलेश राणे म्हणाले, सुधीर कलिंगण म्हणजे चांगला धीर, आधार देणारे व्यक्तीमत्व होते. आज दशावताराची अजिंक्य पताका भावी पिढीच्या खांदयावर देऊन ते गेले आहेत. ती पताका नितीन आसयेकर आणि इतर कलाकार निश्चित पार पाडतील. हीच सुधीर कलिंगण यांना श्रध्दांजली ठरेल, असे ते म्हणाले. त्यावेळी नितीन आसयेकर यांनी सुधीर कलींगण यांच्या आठवणी जागृत करुन उपस्थिताचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!