कोकणवर शोककळा : दशावतारी कलेचा लोकराजा हरपला !

प्रख्यात दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण यांचे उपचारा दरम्यान निधन

सिंधुदुर्ग : कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र लोकराजा सुधीर कलीगंण यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने गोवा येथील व्हिजन हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच उपचारांदरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेचे फार मोठे नुकसान झाले आहे.

दशावतारी नाट्य मंडळांमधील श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे सुधीर कलिंगण हे मालक होते. दिवंगत दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पुत्र होते. पारंपारिक दशावतारी कलेला आधुनिकतेचा साज देते नवनवीन नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. दशावतारी कला ही साता समुद्रापार पोहचविण्यात मोठा वाटा उचलला होता. दशावतारातील लोकराजा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने दशावतारी कलेचे मोठे नुकसान झाले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!