राज्यात उद्या (सोमवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं संपुर्ण देशात शाेककळा पसरली आहे. केंद्र सरकारने लता दीदींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात दाेन दिवस दुखावटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातही उद्या (साेमवारी) सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ट्विटर वरून याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने ट्विट करुन उद्या सार्वजनिक सुटी जाहीर केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या (साेमवारी) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुटी राहील.