मालवणात आधारकार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; उद्या पुन्हा आयोजन

माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने उपक्रम ; दुरुस्ती सोबतच नवीन नोंदणीची संधी

कुणाल मांजरेकर

मालवण : शहरात आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया जटील बनली असताना मालवणात माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या वतीने शुक्रवारी दुपारनंतर आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा ३९ जणांनी लाभ घेतला. दरम्यान, नागरिकांचा प्रतिसाद पाहून उद्या (शनिवारी) देखील हे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय आप्पा लुडबे यांनी घेतला आहे. आप्पा लुडबे यांच्या वायरी येथील निवासस्थानी हे शिबिर होणार आहे.

आप्पा लुडबे यांनी काही दिवसांपूर्वी मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर आयोजित केले होते. यावेळी देखील आधारकार्ड दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर श्री. लुडबे यांनी आपल्या वायरी येथील निवासस्थानी शुक्रवारी पुन्हा एकदा आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्ती शिबीर आयोजित केले होते. यावेळी ३९ जणांची आधारकार्ड अपडेट करण्यात आली. या प्रतिसादामुळे उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता पुन्हा एकदा हे शिबीर भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. यावेळी किमान ५० आधार कार्ड अपडेट होणार असून या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आप्पा लुडबे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!