राज्यात कोरोनाचा विस्फोट ; राज्य सरकारची उद्यापासून नवीन नियमावली

मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात आज तब्बल ४१ हजार १३४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्णही महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्यापासून नवीन नियमावली जाहीर केली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शनिवारी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात उद्या मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. 

राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध 

सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक 

प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही 

लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी 

अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी 

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी 

१५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद 

स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद 

हेअर कटिंगची दुकानं ५० टक्के क्षमतेने सुरू, रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहणार 

पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू 

रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे

नाट्यगृह, सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. 

नाट्यगृह, सिनेमागृहात  संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी. मात्र रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृह बंद

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!