राजकिय अभिनिवेश बाजूला ठेवत दत्ता सामंतांच्या अभिष्टचिंतनास कार्यकर्त्यांची गर्दी
वाढदिवसानिमित्ताने कोरोना प्रतिबंधक “जलनीती” आणि “मिथिलीन ब्लू” चे वाटप
कुणाल मांजरेकर
मालवण : भारतीय जनता पार्टीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि कुटुंबीयांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी दत्ता सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते आणि चाहते उपस्थित राहिले. कोरोनाच्या काळातील दत्ता सामंत यांच्यातील दातृत्वाचा अनुभव संपूर्ण जिल्ह्याने घेतला होता. आज वाढदिवसाच्या औचित्याने उपस्थितांसाठी “जलनीती” आणि “मिथिलीन ब्ल्यू” औषधाचे वाटप करण्यात आले.
भाजपा नेते दत्ता सामंत यांना मानणारा वर्ग सर्वच राजकीय पक्षात कार्यरत आहे. त्यांच्या ५३ वा वाढदिवसा निमित्ताने याची पुन्हा एकदा प्रचिती आली. राजकिय अभिनिवेश बाजूला ठेऊन शिवसेनेसह अन्य पक्षात कार्यरत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दत्ता सामंत यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली.
सकाळ पासूनच त्यांच्या घुमडे येथील निवासस्थानी जिल्ह्यातून आलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर सायंकाळी उशिरा त्यांचा अभिष्टचिंतन कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. दत्ता सामंत यांची मुलगी कु. सानवी हिचाही आजच वाढदिवस असल्याने या दोघांचाही वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर, जि. प. चे वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, उपसभापती राजू परुळेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष साटविलकर, बाळू कुबल, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, संजय नाईक, ऋषी पेणकर, सतीश वाईरकर, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, दीपक केळुसकर, अमोल केळुसकर, युवराज चव्हाण, दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, प्रशांत बिरमोळे, निलेश बाईत, बाळा माने, प्रशांत परब, ललित चव्हाण, संदीप भोजने, सौ. प्रतिमा भोजने, राजू बिडये, विराज पाटकर, राजन माणगावकर, मधुकर चव्हाण, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.