सावंतवाडी मोती तलावात परंपरागत नारळी पौर्णिमा साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) 
सावंतवाडी शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे संस्थानचे राजे खेम सावंत भोसले व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे पूजन करून तो मोती तलावात अर्पण करण्यात आला.यावेळी उपस्थित नागरिकांनी नारळ तलावात अर्पण केला. यावेळी पोलीस आनंद यशवंते, सतीश कविटकर, महेश जाधव, प्रवीण सापळे, सखाराम भुई, सुनील सावंत, दर्शन सावंत, प्रसाद कदम, भूषण भोवर आदी उपस्थित होते .

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!