मालवण पंचायत समितीच्या वतीने अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार

पत्रकार अमित खोत यांचाही सन्मान प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी, कर्मचारी सन्मानित

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने प्रशासकीय विभागातून १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२१-२२ या पुरस्काराने पत्रकार अमित खोत यांना सन्मानित करण्यात आले.

मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे पंचायत समितीच्या क्रीडा, कला महोत्सवाची सांगता शनिवारी झाली. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, पस सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, कमलाकर गावडे, सागरिका लाड, एकात्मिक बालविकास अधिकारी कौमुदी रसाळ-पराडकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शाखा अभियंता राजेंद्र चौगुले, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, कृषी अधिकारी संजय गोसावी, क्रीडा शिक्षक अजय शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र चौगुले (शाखा अभियंता जिप उपविभाग मालवण), शामराव जाधव (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा), सुरज बांगर (विस्तार अधिकारी आरोग्य विभाग), सौ. कौमुदी रसाळ पराडकर (आयसीडीएस), अमित खोत (पत्रकार विभाग), प्रमोद मुणगेकर (वरिष्ठ सहायक), युगंधारा तेंडुलकर (कनिष्ठ सहायक), अनिल खडपकर (केंद्र प्रमुख), शर्वरी सावंत (मुख्याध्यापक मसुरे नं १), श्वेता यादव (उपशिक्षक मालवण), विनोद कदम (पदवीधर शिक्षक मसुरे नं १), ग्लोरिया ब्रिटो (आरोग्य सेविका सुकळवाड), लक्ष्मण नातेवाड (आरोग्य सेवक नांदरुख), छंदा सडविलकर (ग्रामसेवक राठीवडे), डी व्ही माईणकर (सहायक पशुधन अधिकारी, कोळंब), प्रभाकर कदम (परिचर पंचायत समिती मालवण) या सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!