मालवण पंचायत समिती क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मालवण : मालवण पंचायत समितीच्या वतीने पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. गुरुवारी मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सदस्य अशोक बागवे, मनीषा वराडकर, सहायक गटविकास अधिकारी शाम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संजय माने आदी व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पत्रकार विरुद्ध पदाधिकारी-अधिकारी- कर्मचारी या मैत्रीपूर्ण सामन्याने क्रीडा महोत्सवाची सुरवात झाली. दिवसभर विविध स्पर्धा संपन्न होणार आहेत.

शनिवार ११ डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे सांस्कृतिक महोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!