भाजप महिला आघाडीच्या समर्थ बुथ- रक्षाबंधन कार्यक्रमाचा उद्या कुडाळात शुभारंभ
कुडाळ : भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने शनिवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मराठा समाज सभागृहात समर्थ बुथ- रक्षाबंधन कार्यक्रमाचा शुभांरंभ करण्यात येणार आहे, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, समर्थ बुथ अभियान लोकसभा संयोजक अतुल काळसेकर व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी यावेळी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे यांनी केले आहे.