सर्वात मोठा विनोद ; दहशतवादाला कोणताही धर्म नसतो..!


पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेना आमदार निलेश राणेंचे ट्विट ; भ्याड हल्ल्याचा केला तीव्र शब्दांत निषेध
सिधुदुर्ग | कुणाल मांजरेकर

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात धर्म विचारून निर्दयीपणे ठार मारण्यात आले. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या संतापजनक घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. हा सर्वात मोठा विनोद असल्याचे ट्विट करून पहलगाम येथील भ्याड दहशतवाद हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याची घटना अतिशय दुर्दैवी व मन सुन्न करणारी आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना, अशी पोस्ट आ. निलेश राणे यांनी केले आहे.

