मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर

सेक्रेटरीपदी कृष्णा ढोलम : उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत : खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांची निवड

मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपपदी दत्तपसाद पेडणेकर तर सेक्रेटरी पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत, खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी नितीन गावडे यांसह कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

जिल्हा पत्रकार संघ निरीक्षक किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर यांसह जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार संघांचे मावळते अध्यक्ष संतोष गावडे यांच्या प्रमुख उपस्थित निवड प्रक्रिया मालवण शासकीय विश्रामगृह सभागृह येथे पार पडली.

मालवण तालुका पत्रकार संघ कार्यकारणी सदस्यपदी संतोष हिवाळेकर, विकास गांवकर, भूषण मेतर, संग्राम कासले, उदय बापर्डेकर, आप्पा मालंडकर, राजेश पारधी यांसह पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत यांची निवड निश्चित करण्यात आली.

यावेळी मालवण पत्रकार समितीचे जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, राजा खंडाळेकर, प्रफुल्ल देसाई, विवेक नेवाळकर, डि. टी. मेथर यांसह मनोज चव्हाण, महेश सरनाईक, सिद्धेश आचरेकर, समीर म्हाडगुत, प्रशांत हिंदळेकर, सौगंधराज बादेकर, गणेश गांवकर, अनिल तोंडवळकर, सुरेश घाडीगावकर, सुधीर पडेलकर, भाऊ भोगले, झुंजार पेडणेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, नितीन आचरेकर संतोष अपराज आदी पत्रकार उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4247

Leave a Reply

error: Content is protected !!