प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यातील संपर्काचा दुवा ठरणाऱ्या ‘येतंव’ ॲपचे मालवणात लोकार्पण


मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्याहस्ते झाले लोकार्पण ; मालवण व्यापारी संघ व जिल्हा व्यापारी संघाचा पुढाकार
मालवण : सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या पुढाकारातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ‘येतंव’ या स्थानिक प्रवासी पर्यटक व ऑटो रिक्षा वाहन चालक यांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या मोबाईल ॲपचे लोकार्पण रामनवमीच्या निमित्ताने मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते केक कापून भरड येथील मालवण हेरिटेज येथे संपन्न झाले. झॅपॲप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे ॲप विकसित केले आहे.

सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू मालवण आहे. येथे नैसर्गिक विपुलता मोठया प्रमाणात आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक याठिकाणी अनेक भागात भेट देताना. अनेक पर्यटकांना प्रवासा दरम्यान रिक्षाची आवश्यकता असते. तसेच स्थानिक नागरिक यांच्याही रिक्षा प्रवासाची गरज ओळखून प्रवास आपल्या माणसांसोबत या संकल्पनेतील ‘येतंव’ ऑटोरिक्षा ॲप महत्वपूर्ण ठरणार आहे. हे ॲप उपलब्ध करून देण्यात सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रवासी आणि रिक्षा व्यावसायिक यांसाठी येतंव’ ॲप महत्वाचे पाऊल ठरेलं. असा विश्वास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अन्य कार ऍप प्रमाणे हे ॲप नाही. या ॲपच्या माध्यमातून प्रवासी व रिक्षा व्यावसायिक यांच्यात थेट संवाद होऊन भाडे निश्चित होणार आहे. कोणतेही कमिशन यात कट होणार नाही. प्रवासी वर्गाला जलद सेवा मिळेल. आणि रिक्षा व्यावसायिक यांनाही फायदेशीर ठरेलं असे हे ॲप असून अधिकाधिक रिक्षा व्यावसायिक यांनी यात सहभागी व्हावे. प्रवासी वर्गानेही या ॲपचा लाभ घ्यावा, असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, मालवण तालुका व्यापारी संघ अध्यक्ष प्रमोद ओरसकर, अरविंद नेवाळकर, रवी तळाशिलकर, सुरेंद्र चव्हाण, मधुकर नलावडे नितीन तायशेटये, उमेश शिरोडकर, राजा शंकरदास, द्वारकानाथ घुर्ये, बाळू अंधारी, गणेश प्रभुलीकर, अरविंद ओटवणेकर, सिडणे रॉड्रिंक्स, मेधा रड्रिक्स, पंकज पेडणेकर, अशोक गाड, हरेश देऊलकार, विकास तायशेटये, हर्षल बांदेकर, चिराग मयेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष पप्या कद्रेकर, संदीप गावकर, अभय कदम, महेंद्र पारकर, सायली, मित्र वाळके, संभव कुडाळकर, सुधाकर माणगावकर, झॅपॲप सोल्युशन कंपनीचे पदाधिकारी यांसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
मालवण शहरात सुमारे 350 रिक्षा आहेत. त्यापैकी काही रिक्षा व्यावसायिक या ॲप सोबत जोडले गेले आहेत. मालवण शहर परिसर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन, चिपी विमानतळ या ॲप माध्यमातून जोडले आहेत. हळूहळू जिल्हाभरात याचा विस्तार करण्याचा मानस नितीन वाळके, प्रसाद पारकर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश प्रभुलिकर यांनी केले..

