बस स्थानकाची जुनी इमारत पाडत असताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान :माझी नगरसेवक यतीन खोत

मालवण प्रतिनिधी :

येथील बस स्थानकाची जुनी इमारत पाडत असताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याला संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. इमारत पाडण्याचे काम लवकरात लवकर उरकण्याची घाई करण्यात आल्यानेच ही दुर्घटना घडली असा आरोप पालिकेचे माजी नगरसेवक यतीन खोत यांनी केला.
दरम्यान नव्या इमारतीच्या झालेल्या नुकसान प्रकरणी भरपाई देण्यात यावी अशी नोटीस संबंधित ठेकेदारास बजावण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले असल्याची माहिती श्री. खोत यांनी दिली.
बसस्थानकाची जुनी इमारत पाडताना नव्या इमारतीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाल्याच्या घटनेची माहिती कळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी तातडीने बस स्थानकावर भेट देत घटनेची पाहणी करत एसटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जुन्या इमारतीत यापूर्वी दोन वेळा अपघात होऊन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आता इमारत जमीन दोस्त होत असताना त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहून काम करून घेणे आवश्यक होते. मात्र याठिकाणी कोणतेही अधिकारी, आगाराचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ठेकेदाराकडून काम लवकर उरकण्याच्या घाईत ही इमारत तोडण्यात येत असताना ही दुर्घटना घडल्याचा आरोप यतीन खोत यांनी केला. इमारत पाडण्याचे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. इमारत पडताना कंपाउंड केलेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतलेली नाही असेही श्री. खोत यांनी सांगितले. याबाबत श्री. खोत यांनी एसटीच्या विभागीय अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत नाराजी व्यक्त केली असता नव्या इमारतीची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी नोटीस जुनी इमारत पाडण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास बजावण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी श्री. खोत यांना सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4193

Leave a Reply

error: Content is protected !!