दशावतार कलाकारांच्या प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी वेधले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे लक्ष

संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची तातडीने बैठक बोलावण्याची सूचना.

कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाट्य मंडळात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रश्नावर आज आमदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यावर असलेले संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत दशावतार कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेऊन यांच्या समस्या कथन केल्या. दशावतार कला सादर करणाऱ्या कलाकारांना राज्य शासनाच्या सांस्कृतीकडे मंत्रालयाकडून साहित्य संपदा व नाट्यकला सादरीकरणासाठी विशेष अनुदान दिले जाते मात्र कोकणातील दशावतारी कलावंत त्यापासून वंचित आहेत.

दशावतार कलाकारांची शासन दरबारी नोंद नाही तसेच अनेक वृद्ध कलाकार हे अनेक दशक नाट्यभूमीवर कला सादर करूनही उपेक्षितच आहेत, त्या सर्वांना न्याय मिळावा यासाठी मंत्रालय स्थरावरून कमिटी गठीत करून दशावतार कला जोपासणाऱ्या कलाकारांची शासनदरबारी अधिकृत नोंद करून त्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी आज संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्याजवळ केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आशिष शेलार यांनी तातडीने बैठक बोलावण्याची सूचना केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4223

Leave a Reply

error: Content is protected !!