कांदळगाव रामेश्वर मंदिरात श्री रामनवमी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा


मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेल्या कांदळगावमधील श्री देव रामेश्वर मंदिरात रविवारी श्रीराम जन्मोत्सव राणे परब मानकरी, कांदळगाव ग्रामस्थ आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
यानिमित्त सकाळी ११ वाजता कीर्तन, १२ वाजता रामजन्म त्यानंतर रामेश्वर मंदिरा भोवती पालखी प्रदक्षिणा संपन्न झाली. दुपारी दोन वाजल्यापासून मंदिर परिसरात आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.


