खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा

सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल : खा.नारायण राणे

मालवण प्रतिनिधी:

सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो. जे मिळविले ते हिमतीने आणि कष्टाने मिळविले.माझ्या कोकणात मी गरिबी ठेवणार नाही हा १९९० साली संकल्प केला होता.आज जिल्हा विकासाच्या प्रगतीवर आहे. गोवा ते खारेपाटण महामार्ग सुशोभिकरण होणार आहे. माझ्या जिल्ह्यात गरिबी ,कुपोषण असता कामा नये. तुम्ही उद्योग व्यवसाय करायला शिका. जेणे करून आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काम करा.हा विकास झाला पाहिजे. माझ्या ७५ व्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाखापर्यंत पोहोचले पाहिजे असे काम करा. माझे आयुष्य वाढण्यास तुम्हा सर्व जनतेचा मोठा वाटा आहे. अशीच साथ मला कायम द्या. असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.
माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सिंधुनगरी येथे शरद कृषी भवनात हा अनेक उपक्रम, विकास कामे, व अनेकांच्या कौतुक सोहळ्याने झाला.७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ओरोस शरद कृषी भवन मध्ये भव्य दिव्य असा ‘खास दिवस खासदारांचा’ हा विशेष वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा सायंकाळी सपन्न झाला खासदार व उत्सवमूर्ती नारायण राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमचा छानदार शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे, माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सौ. नीलमताई राणे,अभिनेत्री क्रांती रेडकर, आयपीएस अधिकारी समीर वानखेडे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजू परब, संजय आंग्रे, काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, कार्यक्रम आयोजक मनीष दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष व्हिक्टर डांट्स, संदीप कुडतरकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. नारायण राणे म्हणाले, साथ चांगली असली तर प्रवास चांगला होतो. आवडी निवडी,आजारपण सर्व पत्नी पाहते. निलेश नितेश चांगले शिकले. १० वाजण्याच्या आत घरात प्रत्येकाने पोहोचले पाहिजे असा आमचा आग्रह.आम्ही व्यावसायिक आहोत.मात्र सर्व व्यवसाय आणि आर्थिक शिस्त पत्नी नीलम यांच्या मुळे लागली आजही ती व्यवसाय पाहते. बँकेत आम्ही कधीही गेली नाही अशी साथ पत्नीची मिळाली.मैत्री जोपासणारे आणि मला काय हवे आहे हे समजून काम करणारे माझे कार्यकर्ते आणि मित्र आहे.त्यामुळे मी घडत गेलो.अशा आठवणींना उजाळा देत माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी आपल्या जीवन पट उलगडला.त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या कामाचे उदाहरणे सुद्धा यावेळी दिली. गुंड दाऊद इब्राहिम कशा पद्धतीने मुंबई मध्ये काम करायचा आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि शिस्त लावली. त्याची उदाहरणे दिली.
सर्व विकास होतो तो आपल्याच करातून होतो तेव्हा आपण किती सरकारला कर देतो याचा विचार झाला पाहिजे. त्यासाठी देशाला कर देणारे बनले पाहजे त्यासाठी इन्कम वाढवा असे काम करा. असे आवाहनही खा.राणे यांनी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4196

Leave a Reply

error: Content is protected !!