धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिराचा 70 वा वर्धापन दिन साजरा


रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण प्रतिनिधी:

धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्तीचा पुन:प्राण प्राणप्रतिष्ठापनेचा तिसरा वर्धापन दिन तसेच मंदिराच्या ७० व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वप्निल चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वसंत गावकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, मच्छीमार नेते बाबी जोगी, तुळशीदास गोवेकर, आनंद जामसंडेकर, बाबू धुरी, महेश सारंग, राजू बिडये, किशोर वेंगुर्लेकर, संजय कासवकर, ताता मसुरकर, नामदेव सारंग, शिवाजी केळुसकर, आबा शिर्सेकर, ललित चव्हाण, सचिन गोवेकर, आदा देऊलकर, छोटू कोयंडे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
दुपारी एक वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

