सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा


शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन मागणी
या मृत्यू प्रकरणाचे व्हिडिओ दोन वर्षे कोणत्या कारणास्तव लपवन ठेवण्यात आले होते, याचाही तपास करण्याची मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्गातील सिध्दीविनायक बिडवलकर अपहरण व हत्या प्रकरणा वरून विरोधकांकडून जोरदार राजकारण करून जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत याशिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासहआज जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी या प्रकरणासोबतच या घटनेला वेगळं वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्याही चौकशीची मागणी करत संबंधीतांनी दोन वर्षे विडिओ लपवून घेवत आता नेमक्या कुठक्या उद्देशाने प्रसारित केले याचाही तपास करण्याची मागणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून प्रसारित केले आहेत.या घटनेतील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षांपूर्वी वैभव नाईक यांच्यासोबतच कार्यरत होता. मात्र.विधानसभा निवडणुकीत त्याने वैभव नाईक यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. वैभव नाईक सत्तेत असतानाहे प्रकरण अडकवून ठेवण्यात आले होते.मात्र दोन वर्षानंतर अचानक वैभव नाईक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून या खून प्रकरणाला वाचा फोडली आहे.आरोपी सिद्धेश शिरसाटज याने वैभव नाईक यांची साथ सोडल्यानंतरवैभव नाईक यांनी हे प्रकरण अचानक बाहेर का काढले ? त्याचप्रमाणे आता या प्रकरणाच्या आडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना आमदार निलेश राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्ह्याची बदनामी करण्याचे प्रयत्न वैभव नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून होत आहेत.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या संपूर्ण प्रप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, संतोष साटविलकर, दादा साईल, विनायक राणे, अरविंद करलकर, ओंकार तेली, रत्नाकर जोशी आदी उपस्थित होते.

