श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त वटवृक्ष मंदिरात सामुदायिक पारायण सेवेस प्रारंभ.

२७६ भाविकांचा पारायण सेवेत सहभाग.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचे
चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात्मक प्रमुख उपस्थितीत विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली मोठ्या भक्तीमय वातावरणात श्री गुरुलीलामृत या पोथीच्या सामुदायिक पारायण (पोथीवाचन) सेवेस आज देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात प्रारंभ झाले. ही पारायण सेवा दरवर्षी प्रमाणे आज दिनांक १५ एप्रिल ते दिनांक २५ एप्रिल अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या पारायण सोहळ्यात २७६ भाविकांनी सहभाग नोंदविले असल्याची माहिती देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे यांनी दिली.
महिला भाविकांची या सोहळ्यात अग्रक्रमाने उपस्थिती आहे. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवातील या पारायण सोहळ्यात
श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पोथी वाचन करणे म्हणजे पारायणकर्ते भाविकांना स्वामी भक्तीची मिळालेली अमृत योग संधी आहे. सालाबादानुसार परंपरेप्रमाणे याही वर्षी देवस्थानने या पारायण सेवेची संधी भक्तांना उपलब्ध करून दिली आहे. आजपर्यंत अनेक पुरुष व महिला भक्तांनी पारायण सेवा केल्याने विविधरुपी स्वामींची प्रचिती येऊन जीवनातील विविध संकट तारून जीवन कृतार्थ झाले अशी अनेक स्वामी भक्तांची मान्यता आहे. भविष्यातही जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी या पारायण सोहळ्यात सहभागी होऊन स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी घ्यावे
अशी भावना इंगळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. या प्रसंगी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीपाद सरदेशमुख, गिरीश पवार, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, श्रीशैल गवंडी, संजय पवार, संतोष जमगे, अक्षय सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, महेश काटकर, प्रसाद सोनार, बापू घोसले इत्यादी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4258

Leave a Reply

error: Content is protected !!