झाराप सर्कल, पावशी सर्व्हिस रोड व अंडरपाससाठी २३ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पावशी सर्व्हिस रोड व  अंडरपास त्याचबरोबर झाराप सर्कल या तीन कामांच्या उर्वरित कामासाठी २३ कोटींचा निधी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत कुडाळ येथे शुक्रवारी आढावा बैठक घेतली. यावेळी जमीनमालकांशी भूसंपादनाबाबत चर्चा करण्यात आली.
           चौपदरीकरणांतर्गत  कुडाळ शहर हद्दीत गटारांचे काम  अर्धवट ठेवण्यात आले आहे. ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरॊबर आर. एस. एन. हॉटेल जवळ वाहनांची व नागरिकांची वर्दळ असल्याने त्याठिकाणी गतिरोधक उभारण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महामार्ग प्राधिकरणचे  कार्यकारी अभियंता सलीम शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. जोशी, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे श्री. बंड, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,  जि. प. गटनेते नागेंद्र परब,  तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे यासंह दिलीप बिल्डकॉन व केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3846

Leave a Reply

error: Content is protected !!