एनएमएमएस परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलचे नेत्रदिपक यश

मालवण (प्रतिनिधी)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २०२०- २१ इयत्ता ८ वी साठी परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमधून एकूण १५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ४ विद्यार्थ्यांना एनएमएमएस स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. या परीक्षेत भंडारी हायस्कुलच्या प्राची हरिश्चंद्र पेंडूरकर (७६), साक्षी नित्यानंद तरवडकर (१००), सानिका गुरुदास मालंडकर (९९), नारायण दिपक राऊळ (९३) यांनी शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या विद्यार्थ्यांना भंडारी हायस्कुलच्या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भंडारी एज्यू सोसा. ( मालवण) मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, स्थानिक समिती सेक्रेटरी दशरथ कवठकर, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!